ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 स्कूटर रेंजच्या यशानंतर इलेक्ट्रिक टू-व्हीलरची सर्वात मोठी उत्पादक बनली आहे.
कंपनी दर महिन्याला 20,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे.
Ola ची नवीन ई-स्कूटर Ola S1 Air आहे आणि याची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कंपनी काही नवीन उत्पादनांची घोषणा करणार आहे.
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये
या स्कूटरशी संबंधित काही नवीन अपडेट्स जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता याचा खुलासा केला जाईल
एका रिपोर्टनुसार, कंपनी S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरच्या नवीन प्रकाराचे अनावरण करू शकते.
काही रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, नवीन स्कूटर S1 Air पेक्षाही स्वस्त असू शकते
जी बाजारात 100-110 cc पेट्रोल स्कूटरशी स्पर्धा करेल.
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल भारतात इलेक्ट्रिक वाहने,
विशेषत: इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्वस्त बनविण्यावर भर देत आहेत