बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांनाच घायाळ करत आहे. नुकतेच नुसरतने तिचे अतिशय सुंदर आणि पारंपारिक अवतारातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून, तिचा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. नुसरतचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक बंगाली साडीमध्ये दिसत आहे. पारंपारिक बंगाली वेशभूषेत तिने दुर्गापूजेदरम्यान ‘सिंदूर खेला’चा आनंद लुटला आहे. सिंदूर, गळ्यात सुंदर नेकलेस, कपाळावर टिकली आणि मोकळ्या केसांमध्ये नुसरतची स्टाईल मनमोहक दिसते आहे. नुसरत जहाँने हा बंगाली पारंपारिक गेटअप केला आहे, जो अतिशय आकर्षक दिसत आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर तिच्या लूकमुळे नुसरत अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेते