आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.



आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी केली.



बॉयकॉट लाल सिंह चड्ढा या हॅशटॅगचा ट्रेंड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.



हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते आता घरबसल्या पाहू शकणार आहेत.



कारण लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.



चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर सहा महिन्यांनी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.



नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.



नेटफ्लिक्स इंडियानं त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.



नेटफ्लिक्सनं त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही पॉपकॉर्न आणि गोलगप्पे तयार ठेवा कारण लाल सिंह चड्ढा हा ओटीटीवर रिलीज झाला आहे. '



चित्रपट ओटीटीवर लवकर रिलीज करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला.