'छोटी सरदारनी' या मालिकेमध्ये ‘मेहेर’ची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया आता ‘बिग बॉस 16’च्या घराचा भाग बनली आहे.
अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. आपले विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते.
‘बिग बॉस 16’मध्ये प्रवेश केल्यापासून निमरित कौर अहलुवालिया विशेष चर्चेत आली आहे.
अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त निमरित कौर अहलुवालिया वकील देखील आहे. निमरित कौर अहलुवालिया अभिनेत्री होण्यापूर्वी मॉडेल देखील होती.
तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2018 मध्ये निमरितने ‘फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेतही भाग घेतला होता.
त्यात निमरितचा टॉप-12मध्ये समावेश होता. 'छोटी सरदारनी' व्यतिरिक्त निमरित कौर अहलुवालिया 'नाटी पिंकी की लव्ह स्टोरी'मध्येही दिसली आहे.
याशिवाय ती इतर काही शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणूनही झळकली होती. निमरित कौर काही म्युझिक व्हिडीओ आणि 'खतरा खतरा'सारख्या रिअॅलिटी शोचा भागही बनली आहे.
निमरित कौर ही दिल्लीची असून, तिचे शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण झाले आहे. तर, मोहाली येथील महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे.