जगातील सर्वात महागडी कार कोणत्या 3 लोकांकडे आहे?

Published by: मुकेश चव्हाण

रोल्स रॉयसच्या गाड्यांना जगभर पसंती आहे.

कंपनीची बोट टेल कार जगातील सर्वात महागड्या कारमध्ये गणली जाते.

जगातील सर्वात महागडी कार कोणत्या 3 लोकांकडे आहे?, जाणून घ्या

रोल्स रॉयस गाडीची किंमत 233 कोटी रुपये आहे.

रोल्स-रॉयस बोट टेल एक चार आसनी सुपरलक्झरी कार आहे.

या गाडीच्या आतापर्यंत फक्त तीनच गाड्या बनवल्या गेल्या आहेत, हे विशेष आहे.

या तीन गाड्यांपैकी एकाचे मालक अब्जाधीश रॅपर जे-झेड आणि त्याची पत्नी बेयॉन्से आहेत.

दुसरी कार अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू माउरो इकार्डी आणि तिसरी पर्ल इंडस्ट्रीच्या मालकाकडे आहे.

तिन्ही कार ग्राहकांनुसार खास रित्या तयार करण्यात आले आहेत.