मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्य संपवलं

Published by: जयदीप मेढे
Image Source: FACEBOOK

मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर यांनी काम ना मिळलो मुळे आणि नैराश्यामुळे आत्महत्या केली, ही बातमी मन हेलावणारी आहे.

Image Source: INSTAGRAM

छोट्या पडद्यावर विविध मालिकांमधून अभिनय करणाऱ्या तुषारचा चेहरा प्रेक्षकांमध्ये ओळखीचा झाला होता.

Image Source: INSTAGRAM

‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’ आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यासारख्या मालिकांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Image Source: INSTAGRAM

‘भाऊबळी’, ‘उनाड’ आणि ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी आपली छाप सोडली होती.

Image Source: INSTAGRAM

‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही तुषार यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.

Image Source: INSTAGRAM

अलीकडेच 'सन मराठी' वाहिनीवरील 'सखा माझा पांडुरंग' मालिकेत ते झळकले होते.

Image Source: FACEBOOK

तुषार मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा असून रुपारेल महाविद्यालयात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती.

Image Source: INSTAGRAM

महाविद्यालयीन जीवनात ‘घाड्या’ या टोपणनावाने ते मित्रांमध्ये प्रसिद्ध होते.

Image Source: INSTAGRAM

त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.

Image Source: INSTAGRAM

“माणसं आतून किती तुटलेली असतात हे दिसत नाही” असे म्हणत वैभव मांगले यांनी त्यांच्या जाण्याने मन सुन्न झाल्याचे सांगितले.

Image Source: INSTAGRAM