औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Image Source: ABP MAJHA
पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने औसा शहरात आल्यानंतर अचानक पेट घेतला.
Image Source: ABP MAJHA
वेग कमी झाल्याच्या क्षणी टायर फुटल्याने आग लागली आणि काही क्षणांतच ती भीषण स्वरूप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.
Image Source: ABP MAJHA
सुदैवाने, आग लागण्याआधीच आतील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचे सामान आणि वैयक्तिक साहित्य पूर्णतः जळून गेले.
Image Source: ABP MAJHA
आगीचा भडका इतका मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि घरालाही आग लागली. या दोन्ही ठिकाणीही मोठे नुकसान झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे.
Image Source: ABP MAJHA
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले, पण तोपर्यंत ट्रॅव्हल्स, दुकान आणि घराचा मोठा भाग नष्ट झाला होता.
Image Source: ABP MAJHA
प्रवाशांचा जीव वाचवला असला तरी, मालमत्तेचे झालेले नुकसान आणि प्रवासादरम्यानची ही भीषण घटना प्रवाशांचा थरकाप उडवणारी आहे.
Image Source: ABP MAJHA
औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. तात्काळ प्रशासनास सूचना केल्या.