या दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत अशी घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली.
पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या योजना राबवत आहोत.याचा फायदा 3.5 कोटी तरुणांना होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत आणि एक वेळ येईल जेव्हा लाल किल्ल्यावरून तुम्हाला हा संदेश दिला जाईल. असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
जर स्वावलंबन कमी झाले तर ताकदही कमी होते. स्वतःच्या ताकदीचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी स्वावलंबन खूप महत्वाचे आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला.
सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
जर आपण देशाच्या मातीचा सुगंध असलेल्या सर्व वस्तू खरेदी केल्या आणि भारताला समृद्ध
करण्यासाठी देशाच्या वस्तू देखील खरेदी केल्या, तर तुम्हाला दिसेल की देश पुढे जाईल. असं नरेंद्र मोदी म्हणाले.
शेतकरी आणि मच्छिमाऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही. दुसऱ्याची रेष छोटी करण्यात
शक्ती घालवण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करु, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत.
मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे. असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
100 वर्षांपूर्वी, एक संघटना जन्माला आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला आला ज्याने व्यक्ती निर्माण करून राष्ट्र उभारणीसाठी सतत काम केले आहे आणि स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. एकाप्रकारे, ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे जी देशासाठी सतत काम करत आहे, मी तिला सलाम करतो.
नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे.