केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ तिकिट बुकिंग नियमात बदल जाहीर केले. या बदलांची अंमलबजावणी 1 जुलै 2025 पासून होईल.
1 जुलैपासून, आधार प्रमाणीकरण केलेल्या IRCTC खात्यांनाच तात्काळ तिकिट बुक करण्याची सुविधा मिळेल.या बदलामुळे बुकिंग प्रक्रियेत सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवली जाईल.
15 जुलै 2025 पासून, ऑनलाइन तात्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य होईल.यामुळे केवळ प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकिट बुकिंगची सुविधा मिळेल.
पीआरएस काउंटरवर तात्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी प्रमाणीकरण आवश्यक होईल. अधिकृत एजंट्ससाठी देखील ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल.
एजंट्सना तात्काळ तिकिट बुकिंगसाठी बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांत बुकिंग करता येणार नाही.वातानुकूलित श्रेणीसाठी 10:00 ते 10:30 आणि बिगर वातानुकूलित साठी 11:00 ते 11:30 या वेळेच्या कालावधीत हे निर्बंध लागू राहतील.
हे बदल तात्काळ तिकिट बुकिंग प्रणालीतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केले जात आहेत. यामुळे गैरवापर कमी होईल आणि प्रवाश्यांना योग्य तिकिटे मिळतील.
सीआरआयएस आणि आयआरसीटीसीला तिकिट बुकिंग प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व संबंधित विभागांना या बदलांची माहिती दिली जाईल.
प्रवाशांना त्यांच्या आयआरसीटीसी प्रोफाइलशी आधार जोडणी पूर्ण करण्याचा आग्रह करण्यात आलेला आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 नंतर कोणत्याही समस्येपासून बचाव होईल.