पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण
Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
Image Source: ABP MAJHA
देशभरात 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह आहे, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Image Source: ABP MAJHA
अनेक शासकीय कार्यालयांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय.
Image Source: ABP MAJHA
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 140 कोटी भारतीयांचा ऊर अभिमानानं भरुन आल्याचं सांगितलं.
Image Source: ABP MAJHA
तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही नरेंद्र मोदींनी भाष्य केलं.
Image Source: ABP MAJHA
आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला.
Image Source: ABP MAJHA
सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
Image Source: ABP MAJHA
आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
Image Source: ABP MAJHA
सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.