नेटफ्लिक्सवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवरील अशा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही घरी बसून पाहू शकता.



'तलाश' हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली होती.



प्रियांका चोप्राचा 7 खून माफ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटात इरफान खान,नसीरुद्दीन शाह यांनी काम केले.



द गर्ल ऑन द ट्रेन हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज झाला होता.



रिभू दासगुप्ता दिग्दर्शित द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटात परिणीती चोप्रा, अविनाश तिवारी, अदिती राव हैदरी आणि कीर्ती कुल्हारी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.



गेम ओव्हर हा चित्रपट अश्विन सरवणन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करण्यात आले असून हिंदीत डब करण्यात आले आहे.



हिट: द फर्स्ट केस हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केले होते. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक आहे.



हिट: द फर्स्ट केस या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत.



तोरबाज हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिक यांनी केले होते. संजय दत्त एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो आपली पत्नी आणि मुलगा गमावतो.



कुकी गुलाटी दिग्दर्शित धोखा या चित्रपटात आर माधवन, खुशाली कुमार, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना या कलाकरांनी काम केले. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.