हिंदू धर्मात पितृ पक्ष अत्यंत महत्वाचे मानले जाते. पितृ पक्षात पितरांना पिंडदान, तर्पण अर्पण करतात. तसेच त्यांच्या मृत्यूच्या तारखेला श्राद्ध विधी करतात
यामुळे पितर प्रसन्न होतात आणि आप्तेष्टांना आशीर्वाद देतात,
ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांसाठी हा पितृ पक्ष खूप शुभ आहे. जाणून घ्या
मेष : या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील, उत्पन्न वाढेल, यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
कर्क : या काळात तुमचा प्रवास होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी आनंदाची बातमी असून त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो
मिथुन : पितृपक्षाच्या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.
कन्या : पितृपक्षात आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य चांगले राहील. तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नाचा प्रस्ताव शोधत असाल तर हा काळ चांगला आहे.
धनु : पितृपक्षात खरेदी करणे शुभ मानले जात नाही. मात्र या कालावधीत या राशीच्या लोकांचा वाहन किंवा रिअल इस्टेट खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
कुंभ : पितृपक्षात वैवाहिक जीवन आनंदी आणि शांत असेल. अनपेक्षित संपत्ती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, नोकरी बदलण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे.
पितृ पक्षातील वस्तूंचे दान केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात.