काळूबाई मंदिर - देवी काळूबाईचे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई भागात डोंगरावर 4650 फूट उंचीवर आहे







चतुर्श्रृंगी मंदिर - पुणे सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले पुण्याचे प्रसिद्ध चतुश्रृंगी मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे.



रेणुका देवी मंदिर- महाराष्ट्रातील माहूर क्षेत्र रेणुका देवी मंदिरासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.



तुळजा भवानी मंदिर - तुळजा भवानी मंदिर हे सोलापूरपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेले, 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.



एकवीरा देवी मंदिर - लोणावळा येथे एकवीरा देवी मंदिर असून आदिमाया एकवीरा देवीची पूजा केली जाते.



सप्तशृंगी देवी मंदिर - नाशिक महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे, नाशिकपासून सुमारे 60 किमी अंतरावर 4800 फूट उंच सप्तशृंग पर्वतावर विराजमान आहे.



वज्रेश्वरी मंदिर - मुंबईपासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेले वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर आहे. नवरात्रीच्या दिवसात येथे मोठ्या उत्साहात वज्रेश्वरी देवीचा उत्सव साजरा केला जातो.



मुंबा देवी मंदिर- हे मुंबईतील भुलेश्वर येथे स्थित आहे, ज्यावरून मुंबई शहर हे नाव पडले