शहादा शहरात खोदकाम करताना सापडलं पुरातन मंदिर
शहादा (Shahada) शहराला लागून कुकडेल भागातील
शनिमंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन मढीच्या जागेवर खोदकाम करताना
समाधीवजा शिवलिंग, चबुतरा व पादुका आढळून आली आहे.
हा परिसर प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक भाग समजला जातो.
त्यामुळेच अनेकदा ऐतिहासिक वास्तू खोदकामात निदर्शनास आल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीच्या काठालगत शनि मंदिर आहे
मंदिरापाठीमागे भावसार समाजाची जागा आहे.
नेक वर्षापासून या भागात माणूस फिरकत नाही.
आजूबाजूची सगळी माती बाजूला काढून चबुतऱ्याखाली समाधी शिवलिंग दिसून आले