नांदेड जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक धबधब्याचे प्रवाह खंडित झाले होते. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हे धबधबे पुन्हा फेसाळत कोसळतानाचे चित्र आता पाहण्यास मिळतंय. नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहुर तालुका म्हटलं की, पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर,आई रेणुका मातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेली रामगड किल्ला, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर, घनदाट हिरवेगार जंगल असे चित्र डोळ्या समोर येते. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत असून किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील ऐतिहासिक सहस्त्रकुंड धबधबा वाहतोय दरम्यान फेसाळत वाहणाऱ्या धबधब्याचे हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडनारे आहे. दरम्यान हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचाही ओघ या पर्यटन स्थळांकडे वाढला आहे.