माहूर शहरापासून 12 किलोमिटर आहे - शेख फरीद वझरा धबधबा. जोरदार पावसानंतर हा धबधबा ओसंडून वाहतोय. पर्यटकांसाठी हा धबधबा पर्यटनस्थळ बनलं आहे. हिरवागार शालूत नटलेल्या धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहा. डोंगर दऱ्यातील पर्वतरांगांच्या कुशीतून हा धबधबा निर्माण झाला. डोंगरावरून कोसळणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी स्थानिक गर्दी करतायत. शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा हा धबधबा नयनरम्य असाच आहे. रेणुका मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची पावलं धबधब्याकडे वळत आहेत.