कोरोनामुळे आता चित्रपटांच्या प्रदर्शनाची शैली बदलली आहे. 2022मध्येही अनेक चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘Gehraiyaan’पासून ते तब्बूच्या ‘Khufiya’पर्यंत अनेक चित्रपट 2022मध्ये OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘Gehraiyaan’ हा चित्रपट प्रेम, वासना आणि आधुनिक नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांतने अतिशय बोल्ड आणि रोमँटिक सीन्स दिले आहेत. ‘Gehraiyaan’ हा चित्रपट 11 फेब्रुवारीला Amazon Prime Videoवर रिलीज होणार आहे.
राजकुमार रावच्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच समोर आली आहे. या चित्रपटात क्राईम आणि कॉमेडीचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे आणि सिकंदर खेर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘चकदा एक्सप्रेस’मध्ये अनुष्का शर्मा महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनुष्का शर्मा मोठ्या ब्रेकनंतर पडद्यावर दिसणार आहे. अनुष्का शर्माच्या ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
‘लूप लपेटा’मध्ये तापसी पन्नू आणि ताहिर राज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
विशाल भारद्वाजचा ‘खुफिया’ हा चित्रपट एका रॉ एजंटची कथा आहे. या चित्रपटात तब्बू, अली फजल, वामिका गाबी आणि आशिष विद्यार्थी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.