'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.

परीचा गोड अंदाज लहानांपासून मोठ्यांनाही आवडत आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त परीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मायराने काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसण्यासोबत हलव्याचे दागिने घातले आहेत.

परीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

परीने आणखी फोटो शेअर करत लिहिलं आहे,दु:ख असावे तीळासारखे आनंद असावा गुळासारखा... तुमचे अवघे जीवन तीळगुळासारखे भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

परीचा संक्रांत स्पेशल लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

परीच्या फोटोवर चाहत्यांनी 'तू तर गोडच आहेस गं बाई', अशा कमेंट्स केल्या आहेत.

काळ्या रंगाची साडी नेसून, केसांत गजरा माळून परीने पारंपरिक लूक केला आहे.

छोट्या परीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.