टीव्हीपाठोपाठ बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.



अभिनेत्रीने मुंबईतून शिक्षण पूर्ण केले आहे. 'मुझसे कुछ कहती हैं... ये खामोशियां' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ती 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकली होती.



या मालिकेमुळे मृणाल खूप लोकप्रिय झाली. अनेक मालिकांमधून ती काम करत राहिली. या मालिकेदरम्यानच ती चित्रपटांसाठी देखील ऑडिशन देत होती.



मृणालने 2014 मध्ये मराठी चित्रपट ‘संध्या’द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.



परंतु, हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.



2018 मध्ये ती इंडो अमेरिकन फिल्म 'लव्ह सोनिया'मध्ये दिसली होती. तिने आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटाद्वारे तिने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पदार्पण केले.



इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



यामध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले



मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'पिपा' चित्रपटाबाबत चर्चेत आहे.



शिवाय मृणालचे 'आंख मिचोली' आणि 'गुमराह' सारखे सिनेमेही रिलीजच्या मार्गावर आहेत.