पृथ्वीराज चौहान आणि भारतावर सतत आक्रमण करणाऱ्या मुहम्मद घोरीची लढाई दाखवण्यात आलेली आहे.



अक्षयकुमारने प्रथमच ऐतिहासिक भूमिका साकारलीय.



पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला त्याने पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे यात शंका नाही.



चित्रपटाच्या क्लायमॅक्सला त्याचा अभिनय खरोखरच चांगला आहे.



संयोगिताच्या भूमिकेत नवोदित अभिनेत्री मानुषी छिल्लरने काही विशेष चमक दाखवली आहे असे नाही.



डॉ. द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा आणि पराक्रम पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य उत्कृष्टरित्या पेललेले आहे



काही संवाद खूपच चांगले असून महिलांना समान संधी देण्याबाबतही चित्रपटात भाष्य करण्यात आलेले आहे.



एकूणच सम्राट पृथ्वीराज चौहान यांची ही शौर्यगाथा पाहण्यासारखी आहे.