राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.



याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.



दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.



तसेच सर्वांनी स्वत: ची काळजी घ्यावी असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते.



लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते.



मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते.



आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता.



या भेटीत फडणवीस दोन अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांची मतं वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हं होती.



मात्र फडणवीसांचा शनिवारचा दौरा तूर्तास रद्द झाला होता.