महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. शनिवार आणि रविवार म्हणजेच एक व दोन ऑक्टोबर असा त्यांचा दौरा आहे. नाशिकला जाण्याआधी आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शिर्डी विमानतळावर खाजगी विमानाने राज यांचे आगमन झाले. शिर्डी येथे नाशिक येथील मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत केले. शिर्डीत साईबाबा समाधी दर्शन (Shirdi Saibaba) घेऊन ते परत विमानाने ओझर विमानतळावर जाणार आहे. दरम्यान आज सकाळी त्यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होते. 'साईबाबांनी आम्हाला खूप काही दिलं आहे', असं यावेळी शर्मिला ठाकरेंनी म्हटलं. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. शिर्डीहून काही वेळातच राज ठाकरे हे नाशिककडे रवाना होणार आहे.