मराठी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता तिचा आगामी सिनेमा दगडी चाळ 2 ही लवकरच येत आहे. यासाठीही ती सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करत आहे. आता देखील या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट तिने केली आहे. सिनेमाच्या पहिल्या पार्टमधील गाण्यावर एक साडीमधील व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. यामध्ये ती एका सुंदर अशा काठापदराच्या साडीत दिसत आहे. तिने व्हिडीओत दिलेले एक्सप्रेशन अगदी चाहत्यांना वेड लावणारे आहेत. ती कायमच वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटो शेअर करत असते. तिला भटंकतीची देखील आवड असल्याने ती विविध ठिकाणचे फोटोही शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने लंडनमधील फोटो शेअर केले होते. तिच्या साऱ्याच फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. आता लवकरत पुजा अंकुश चौधरीसोबत दगडी चाळ 2 मध्ये दिसेल पहिल्या पार्टमध्येही पुजाने उत्कृष्ट काम केलं होतं.