मर्सिडीज कारचे अनेकजण चाहते आहेत. GLC 300 4Matic आणि GLC 220d 4Matic 2023 या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे मर्सिडीज-बेंझ GLC मध्ये एक मानक वैशिष्ट्य म्हणून ऑल-व्हील 4matic ऑफर करेल. GLC मधील AntiG7 इन्फोटेनमेंट सिस्टमसह सुसज्ज असलेली मर्सिडीज-बेंझची ही पहिली SUV असेल. मानक म्हणून ISG असिस्ट इंजिनसह 9G-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल नवीन GLC क्रोमसह AVANTGARDE लाइन देखील दिसेल. Mercedes-Benz GLC ही मर्सिडीज-बेंझची जागतिक बाजारपेठेत तसेच भारतात सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. हेच कारण आहे की, लॉन्च होण्यापूर्वीच याने ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे कंपनीकडून आजपर्यंतचा हा सर्वोत्तम GLC आहे.