मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटोंमध्ये मृणालने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. पारंपारिक लूकमध्येही मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. यासोबत मृणालने कानात मोठे झुमके घातले आहेत. आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)