बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात.



त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.



जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तीचे सुमारे 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.



अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती हटके लूक मध्ये दिसत आहे.



जेनेलियाने या फोटोशूट साठी साडी परिधान केलेली दिसत आहे.



निळी साडी आणि त्यावर हटके ब्लाऊज असा लूक तिने केला आहे.



बन हेअरस्टाइल आणि ब्राईट मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.



2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले.



दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.