मागील सात महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर आज यश मिळाला आहे. (photo credit - PTI)



मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. (photo credit - PTI)



मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. (Photo Credit - Reporter Navi mumbai)



नोंदी सापडणाऱ्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या. (Photo Credit - Reporter Navi mumbai)



54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं आणि (Photo Credit - Reporter Navi mumbai)



ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. (Photo Credit - Reporter Navi mumbai)



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. (Photo Credit - Reporter Navi mumbai)