आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे वादळ जरांगे पाटलांसह मुंबईच्या दिशेने सरकते आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. (Photo Credit : Pune Reporter)



मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत आहे.
(Photo Credit : Pune Reporter)



जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. (Photo Credit : Pune Reporter)



त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (Photo Credit : Pune Reporter)



याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)



मोर्चा मुंबईत दाखल होईल तेव्ह मनोज जरांगे यांच्यासोबतच्या मराठा आंदोलकांची संख्या ही काही लाखात जाईल, असा अंदाज आहे. (Photo Credit : PTI)



मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)



नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)



त्यासाठी नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पोलीस प्रशासनाकडून सहाय्य मिळावं असं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.(Photo Credit : PTI)