मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. नुकताच तिने 'लाल साडी' मधला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. मानुषी या लूकमध्ये नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. अक्षय कुमारसोबत अलीकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर मानुषी छिल्लर याआधीदेखील 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात खिलाडी कुमारसोबत दिसून आली होती. पहिल्याच सिनेमातील मानुषीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. (Photo credit : Instagram/@manushi_chhillar) मानुषीचे इन्स्टाग्रामवर 6.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@manushi_chhillar)