राज्यात आज सर्वदूर अवकाळी पावसाने धूमशान घातले.

अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली,

तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर,

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गंगापूर तालुक्यात जोरदार वादळी वारे; आंबा पिकाचे मोठे नुकसान

उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

साताऱ्यात पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यात कोयना, महाबळेश्वर पाचगणी वाई शिरवळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

रायगड जिल्ह्यातही पावसाची हजेरी

रायगड मधील माणगाव तालुक्यातील लोणेरे परीसरात गारांचा पाऊस कोसळला.

लातूरमध्ये पावसाचे तुफान

लातूर शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली.

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

रत्नागिरीमधील खेडमध्ये देखील चक्रीवादळ आणि झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

खेड भरणे मार्गावर पंचायत समितीसमोर देखील महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळल्यामुळे खेड भरणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

खेडसह चिपळूणमधील ग्रामीण भागात चक्रीवादळ झाल्याने आंबे गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.