आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन आहेत. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये पुजा करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.