अनेकदा चित्रपटांच्या सेटवर अभिनेत्रींच्या रिअल लाईफ लव्ह स्टोरीला सुरुवात होते.
अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील प्रोड्युसर, डायरेक्टरबरोबरच लग्न केले तर काही अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्री बाहेरील व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.
काही अभिनेत्रींच्या पतीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'ब्युटी अँड बिस्ट' असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रींना ट्रोल केलं.
दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी हिने पहिले लग्न मोडल्यानंतर निर्माता रवींद्र चंद्रशेखरनसोबत लग्नगाठ बांधली.
महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
छोट्या पडद्यावरील साथ निभाना साथिया या कार्यक्रमातील गोपी बहु ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीनाचा 14 डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला.
देवोलीनानं जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली.
देवोलीना आणि शाहनवाज यांची जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली नाही. त्यामुळे अनेक युजर्सनं सोशल मीडियाच्या माध्यमातून देवोलीनाला ट्रोल केलं.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या जोडीला देखील अनेकांनी ट्रोल केलं.
बोनी कपूर यांनी मोना कपूर या त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला.
त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले.
जय मेहता आणि जुही चावला यांच्यात सहा वर्षांचा फरक आहे.
जुहीला तिच्या पतीमुळे अनेकदा ट्रोल केले जाते. यांची जोडी 'मिस मॅच' आहे, असंही काही नेटकऱ्यांचे मत आहे.