आज 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार आज एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. 14.2 किलो एलपीजी सिलेंडर, 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुलै महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. दिल्लीत सध्या LPG सिलेंडरची किंमत 1103 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. मुंबईत LPG सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. गेल्या काही महिन्यात सरकारनं व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले होते. जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आलेली. त्यापूर्वी मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये एलपीजीची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती.