आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो.
महिला कित्येक वेळेस आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर असल्याचं दिसून येतं.
वाढत्या वयासोबत येणाऱ्या म्हातारपणाकडेही तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही
वाढत्या वयाबरोबर आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
दुधाशी मैत्री करून आणि त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची हाडे दीर्घायुष्यासाठी मजबूत ठेवू शकता.
तुम्ही घरच्या कामात कितीही व्यस्त असलात तरी योग्य व्यायामासाठी थोडा वेळ काढणे फार महत्वाचे आहे.
तुम्ही योगा आणि चालण्याच्या माध्यमातून वृद्धापकाळातही स्वत:ला निरोगी ठेवू शकता.
ऋतूनुसार येणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे.
निरोगी आयुष्यासाठी आहारातील प्रथिनांच्या गरजांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही दररोज एक वाटी दुग्धजन्य पदार्थ आणि कोरड्या फळांचा आहारात समावेश करू शकता.