दारू प्यायल्यानंतर तहान का लागते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

अनेक लोकांना रोज मद्यपानाची सवय असते.

Image Source: pexels

रोज मद्यपान करणं, आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का, मद्यपान केल्यानंतर तहान का लागते?

Image Source: pexels

तहान लागणं म्हणजे, शरीरात पाण्याची कमतरता आहे.

Image Source: pexels

खरं तर, दारू पिल्यानंतर तहान लागते, कारण दारू एक डाययुरेटिक असते.

Image Source: pexels

ते शरीरातील पाणी टिकवून ठेवणारे व्हॅसोप्रेसिन नावाचे हार्मोन तयार होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता येते.

Image Source: pexels

आणि मद्यपानामुळे मूत्रपिंडातून शरीरातील पाणी लवकर बाहेर टाकले जाते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मद्यपानामुळे तोंडात लाळ कमी तयार होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडू लागते.

Image Source: pexels

दारू पिल्याने मेंदूतील हायपोथॅलेमस ग्रंथी शरीरातील पाण्याची कमतरता पाहून हे संकेत देते आणि आपल्याला तहान लागते.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.