वास्तुशास्त्रानुसार कपडे खरेदी करण्यासाठी आणि परिधान करण्यासाठी शुभ आणि अशुभ असे दोन्ही दिवस असतात.



रविवारच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे अशुभ मानले जाते, पण नवीन कपडे घालणे शुभ असते.



सोमवारच्या दिवशी नवीन कपडे घालू नयेत आणि खरेदीही करू नये. असे केल्याने धन (पैशाची) हानी होते.



मंगळवारी नवीन कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे देखील शुभ असते.



बुधवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा नवीन कपडा घालू नये. असे केल्याने धनहानी होते.



गुरुवारच्या दिवशी नवीन कपडे घालणे आणि खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे धार्मिक आणि पिवळे वस्त्र खरेदी करण्यासाठीही हा दिवस चांगला असतो.



शुक्रवारच्या दिवशीही तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता आणि घालू शकता. कपड्यांच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ असतो.



शनिवारच्या दिवशी कपडे खरेदी करू नये किंवा नवीन कपडे घालू नये. जर या दिवशी नवीन कपडे घालणे आवश्यक असेल, तर ते एक दिवस आधी घालून काढावे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.