सध्या सोशल मिडियावर आरती अर्के यांची 'टोमॅटो चटणी' खूप व्हायरल होत आहे. (Photo credit : Instagram/@aartiarke) जाणून घेऊया या व्हायरल 'टोमॅटो चटणी'ची रेसिपी.. (Photo credit : Instagram/@aartiarke) सर्वप्रथम टोमॅटोला तेल लावून गॅसवर सर्व बाजूने छान भाजून घ्यावे. (Photo credit : Instagram/@aartiarke) त्यानंतर टोमॅटोसोबतचं हिरव्या मिरच्या देखील भाजून घ्याव्या. (Photo credit : Instagram/@aartiarke) भाजलेले टोमॅटो आणि मिरची कापून घ्यावी. (Photo credit : Instagram/@aartiarke) त्यानंतर एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवावे. (Photo credit : Instagram/@aartiarke) तेल तापले की त्यात जिरे आणि कांदा टाकावा. (Photo credit : Instagram/@aartiarke) कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यावा. (Photo credit : Instagram/@aartiarke) त्यानंतर यात भाजलेले टोमॅटो आणि मिरची घालावे. (Photo credit : Instagram/@aartiarke) त्यानंतर स्वादानुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. (Photo credit : Instagram/@aartiarke) हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. (Photo credit : Instagram/@aartiarke) या टोमॅटो चटणीवर कोथिंबीर घालावी आणि पुन्हा सर्व एकत्र कराव. (Photo credit : Instagram/@aartiarke) आपली चमचमीत टोमॅटो चटणी तयार झाली. (Photo credit : Instagram/@aartiarke) पोळीवर मस्त भाजलेली मिरची आणि टोमॅटो चटणी ठेवून याचा आस्वाद घ्यावा. (Photo credit : Instagram/@aartiarke)