दही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

दह्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. मात्र, दह्याचे काही तोटेही आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत का?

Image Source: unsplash

परंतु, दह्याचे सेवन काही खाद्यपदार्थांसाठी करणं धोकादायक ठरु शकतं.

Image Source: unsplash

यामध्ये संत्री, द्राक्षं तसेच लिंबासारखी आंबट फळं दह्यासोबत कधीच खाऊ नयेत.

Image Source: unsplash

आंबट फळे आणि दही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे पचतात, ज्यामुळे पोट बिघडू शकतं.

Image Source: unsplash

मासे आणि दही एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते आणि पोटात गॅस, अॅसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवतात.

Image Source: unsplash

बटाट्यामध्ये स्टार्च आणि दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं त्यामुळे यांचं एकत्र सेवन केल्याने पोटात सूज येऊ शकते.

Image Source: unsplash

साखरेसोबत दह्याचे सेवन केल्यास पचनक्रिया मंदावते.

Image Source: unsplash

शरीरात ऍलर्जी किंवा सूज यांसारख्या समस्या निर्माण होतात.

Image Source: unsplash

टीप: वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash