चपातीत प्रोटीन आणि फायबर कसं वाढवायचं?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

अनेकदा रेडीमेड पीठ बाजारातून आणलं जातं आणि त्यापासून चपात्या बनवल्या जातात.

Image Source: Pinterest

यामुळे शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाही, पचन तंत्र बिघडतं आणि लवकर थकवाही जाणवू लागतो.

Image Source: Pinterest

अशा वेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या चपातीमध्ये अधिक प्रोटीन आणि फायबर वाढवू शकता.

Image Source: Pinterest

गव्हाच्या पिठामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी इतर धान्यांचे पीठ मिक्स करा.

Image Source: Pinterest

या धान्याचे पीठ समान प्रमाणात घेऊनही मिक्स करू शकता.

Image Source: Pinterest

गव्हाच्या पिठात थोडं बेसन किंवा मूगाच्या डाळीचं पीठ मिक्स करू शकता.

Image Source: Pinterest

या मिश्रणाच्या चपातीमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.

Image Source: Pinterest

पीठामध्ये बारीक केलेल्या भाज्या जसे की, गाजर, पालक, कांदा आणि कोथिंबीर मिक्स करा.

Image Source: Pinterest

यामुळे चपातीमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि फायबरचं प्रमाण वाढेल.

Image Source: Pinterest

पिठात अळशीच्या बिया, तीळ किंवा चिया सीड्स पावडर मिक्स केलं तरी बरेच फायदे मिळतात.

Image Source: Pinterest

पीठ मळताना पाण्याऐवजी ताक किंवा दह्याचा वापर करा. यामुळे चपाती मुलायम आणि पौष्टिक होईल.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest