नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत आहे.
July 29, 2025
Published by: abp majha web team
Image Source: Pinerest
यादिवशी आपल्या देवघरात नागाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन सर्वजण करतात
Image Source: Pinerest
असे म्हणतात की, भगवान शिवाच्या सदैव गळ्यात असलेल्या सर्पाचे पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात,
Image Source: Pinerest
व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. हा सण श्रावणातील सर्वात पहिला सण असतो.
Image Source: Pinerest
नागपंचमीची पूजा सकाळी लवकर उठून करावी. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात नागाची मूर्ती किंवा फोटोचे पूजन करावे.
Image Source: Pinerest
दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही वाळू किंवा मातीचा अथवा पिठाच्या गोळ्याचा नाग बनवू शकता.
Image Source: Pinerest
नागाला हळद,दूध,फुले वाहून पूजा करावी. तसेच लाह्या बत्ताशे यांचा नैवेद्य दाखवावा. काहीजण दुधात साखर घालून तो नैवेद्य दाखवतात.
Image Source: Pinerest
तर काही ठिकाणी पुरणाचे दिरढं बनवण्याची पद्धत आहे. यानंतर नागदेवतेला नमस्कार करून 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा किमान एक माळ जप करावा. शेवटी महादेवाची आरती करून पूजेची सांगता करावी.
Image Source: Pinerest
तर काही ठिकाणी पुरणाचे दिरढं बनवण्याची पद्धत आहे. यानंतर नागदेवतेला नमस्कार करून 'ओम नागदेवताय नमः' या मंत्राचा किमान एक माळ जप करावा. शेवटी महादेवाची आरती करून पूजेची सांगता करावी.
Image Source: Pinerest
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही