काळ्या गाजरचा हलवा कसा बनवतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

काळ्या गाजरचा हलवा हिवाळ्यातील एक खास आणि आरोग्यदायी गोड पदार्थ आहे

Image Source: Pinterest

तुम्ही गाजरचा हलवा नक्कीच खाल्ला असेल.

Image Source: Pinterest

पण आज आम्ही तुम्हाला काळ्या गाजरचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

Image Source: Pinterest

सर्वात आधी काळी गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि किसून घ्या.

Image Source: Pinterest

आता एका कढईत साजूक तूप गरम करा आणि त्यात किसलेले गाजर घाला.

Image Source: Pinterest

मंद आचेवर गाजरचा रंग गडद आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्या.

Image Source: Pinterest

त्यानंतर त्यात दूध घाला आणि शिजू द्या, जेणेकरून दूध गाजरात चांगले मुरेल.

Image Source: Pinterest

जेव्हा दूध आटायला लागेल, तेव्हा साखर किंवा गूळ घाला आणि वेलची पावडर आणि चिरलेले सुकामेवा घालून मिक्स करा.

Image Source: Pinterest

हलव्याला तूप सुटेपर्यंत शिजवा, आता गरम गरम काळ्या गाजराचा हलवा वाढा.

Image Source: Pinterest