सिनेप्रेमींसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. सिने-दिगर्शक जेम्स कॅमेरॉन
तेरा वर्षांनंतर सुपरहिट 'अवतार'चा दुसरा भाग घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.
जाणून घ्या या सिनेमासंबंधित महत्त्वाच्या गोष्टी...
'अवतार' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा अॅनिमेशन सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
खेर आता हा सिनेमा उद्या म्हणजेच 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
सॅम वर्थिंग्टन जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो सलदानादेखील महत्तावाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे
जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
जेम्स कॅमेरूनचा 'अवतार 2'(Avatar 2) हा बिग बजेट सिनेमा आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची निर्मिकी 250 मिलिअन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.
रिलीजआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे.
आता हा सिनेमा जगभरात किती कोटींची कमाई करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.