टीम इंडिया विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय.



भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे.



या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.



या मालिकेत केएल राहुलकडं भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.



केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही.



राहुलनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व केलं होतं. या चारही सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्कारावा लागला होता.



मात्र, असं असतानाही निवड समितीनं केएल राहुलला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिलीय.



टी-20 मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा आहे. याचबरोबर त्याची फलंदाजीची शैली कशी आहे? हेही पाहावे लागेल.



केएल राहुलच्या संथ फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते. टी-20 मालिकेत राहुलला या उणिवा दूर करण्याची संधी असेल.