क्रिकेटर के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारी रोजी लग्न करणार आहेत.

अभिनेता सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार या स्टार कपलचं लग्न होणार आहे.

लग्नात सजावटीपासून खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही अगदी सामान्य असेल.

पाहुण्यांना जेवणासाठी उत्तम दक्षिण भारतीय स्वादिष्ट पदार्थ दिले जातील.

राहुल आणि अथिया लग्नाच्या निमित्ताने खास डिझाईन केलेले पोशाख परिधान करणार आहेत.

या दोघांसाठी वेगवेगळ्या डिझायनर्सनी ड्रेस तयार केले आहेत.

21 जानेवारीपासून या स्टार कपलच्या लग्नाचा सोहळा सुरू होणार आहे.

मिका सिंग व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध गायक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

22 जानेवारीला संगीत रात्रीनंतर मेहेंदी सोहळा होणार आहे.

23 जानेवारीला राहुल आणि अथिया सात फेऱ्या घेतील.

या विवाह सोहळ्यासाठी केवळ 100 जणांना आमंत्रित करण्यात आले आहे.