गायक केके आजही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.
केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
केके यांच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे.
केके यांनी गायलेली गाणी आजही लोकांना ऐकायला आवडतात.
केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली.
केके यांनी गाण्याचे किंवा संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नव्हते.
'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘हिप-हिप हुर्रे’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या टीव्ही शोची शीर्षक गीते केके यांनी गायली आहेत.
31 मे 2022 रोजी, केके यांचे कोलकाता येथील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.