बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
'आदिपुरुष' या सिनेमात कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे.
'आदिपुरुष'च्या रिलीजआधी कृती सेनन नाशिकच्या पंचवटीत पोहोचली आहे.
कृतीने नाशिकमधील प्राचीन सीता गुफा आणि काळाराम मंदिरात जाऊन सीतामातेचं दर्शन घेतलं आहे.
सीता गुंफा आणि काळाराम मंदिरातील कृतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कृतीने सीता मातेचं दर्शन घेण्यासोबत सिनेमातील 'राम सिया राम' या गीतावर आरतीदेखील केली.
कृती सेननच्या व्हिडीओवर 'जय सिया राम','जय श्रीराम' अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कृतीच्या 'आदिपुरुष'ची चाहत्यांना उत्सुकता आहे.
कृती सेनन सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.