अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कतरिना उन्हाळ्याचा छोटा ड्रेस परिधान करून झोपडीबाहेर बसून हसताना दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. करिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कतरिना कैफने यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या गर्ल गँगसोबतचे काही फोटो शेअर केले होते. कतरिनाचा नुकताच वाढदिव झाला. या वाढदिवसानिमित्त तिने मैत्रिणींसोबत धम्माल केली आहे. या पार्टीला विकी कौशलचा भाऊ सनी कौशलही उपस्थित होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी देखील कतरिनाचे हे फोटो शेअर केले आहेत.