प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाला कोणतीही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना अभिनय करिअरमधून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे देसी लूक मध्येही करिश्माने आपल्या सौंदर्याची जादू दाखवली आहे. करिश्मा तन्नाने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोतही करिश्माने आपल्या सौंदर्याची जादू दाखवली आहे करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.