मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा ग्रँड फिनाले रविवारी 12 मार्च रोजी झाला.
शेवटच्या दिवशी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये 90 च्या दशकातील अभिनेत्री करिश्मा कपूरनेही धुमाकूळ घातला.
रॅम्प वॉक दरम्यान 48 वर्षांची करिश्मा खूपच सुंदर आणि आत्मविश्वासू दिसत होती.
करिश्मा कपूर तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसत होती.
करिश्मा कपूरने वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
1991 मध्ये प्रेमकैदी हा करिश्माचा पहिला चित्रपट होता.
90 च्या दशकात करिश्मा कपूरने अनारी, जिगर, दुलारा, राजाबाबू, कुली नंबर वन, हीरो नंबर वन, जीत, दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
करिश्मा कपूरने सप्टेंबर 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. परंतु, त्यांचा विवाह जास्त काळ टिकला नाही.