बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती.
करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती.
करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता एका मुलाखतीमध्ये देखील करीरानं तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीमध्ये करीना म्हणाली, 'तो व्हायरल झालेला फोटो एडिट करण्यात आला होता. मी 40 दिवस सुट्टीवर गेले होते. तेव्हा मी खूप पिझ्झा खाल्ला होता. म्हणून माझे वजन वाढले होते. जेव्हा एखाद्या महिलेचं वजन वाढते तेव्हा लोकांना प्रश्न पडतो की, ती प्रेग्नंट आहे का? '
पुढे करीना म्हणाली, 'मी काय मशीन आहे का? हा माझा चॉइस आहे. त्यामुळे मी इन्स्टाग्रामवर ती स्टोरी शेअर केली होती. मी कोणत्याही गोष्टी लपवत नाही. मी आठ प्रेग्नंट होते तेव्हा देखील मी काम करत होते. '
करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन प्रेग्नन्सीबाबत सांगितलं होतं. तिनं या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, 'सर्वांनी शांत राहा मी प्रेग्नंट नाहीये.'
करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
करीनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.